तांदळाची खीर ( Tandlachi Kheer ) म्हणल की आधी तोंडाला पाणी सुटते. मग तो लहान मुलगा असो अथवा मोठा माणूस असो. घरात कोणता सन असो अथवा पाहुणे आलेले असो. कारण कोणतेही असो. गोड आणि चवदार पदार्थ म्हणजे तांदळाची खीर. चला तर मग तांदळाची खीर कशी बनवायची ते जाणून घेऊ..
साहित्य:-
- दिड लिटर दूध
- अर्धा कप तांदूळ
- काजू 10 ते 12 कापलेले
- बदाम 10 ते 12 कापलेले
- विलायची 2 ते 3
- मनुके आवडीनुसार
- खोबर खिसुण
- साखर एक वाटी
- तुप दोन चमच
कृती:-
अर्धा वाटी तांदूळ स्वच्छ धुऊण घ्या. मिक्सरवर दळून घ्या. आणि गॅस वर दुध उकळायला ठेवा. दुधला उकळी आल्या नंतर त्यात तांदळाचे मिश्रण टाका. आणि गॅस मंद आचेवर ठेवा. मिश्रण सतत ढवळत रहा. म्हणजे गाठी होणार नाहीत. दुसऱ्या गॅस वर तुप गरम करायला ठेवा तुप दोन चमच त्यात काजू , बदाम , पिस्ता , कट करून तुपात सोनेरी होई पर्यंत तळून घ्या नंतर दुधात टाका दुधाचा गॅस चालूच राहू द्या तांदूळ मऊ झाल्या नंतर त्यात साखर टाका [ साखर आवडी नुसार कमी जास्त घालू शेकता ] साखर विरघळल्या नंतर पाच मिनिटांनी त्यात वेलची पुड टाका आणि गॅस बंद करा छान अशी खीर बनून तयार होईल.
