साहित्य - पांढरे तिळ एक वाटी , एक वाटी साखर , तीन चमच तुप कृती - जाड बुडाची कढई घ्यायची गॅस वर कढई गरम करायची कढई गरम झाल्या नंतर तिळ भाजू घ्यावे तिळ लवकर भाजतात तडतडल्या वर लगेच काढावे जास्त वेळ भाजल्याने तिळ लाल होतात आणि कडवट लागतात तिळ भाजून बाजूला टेवायचे आणि नॉनस्टिक च्या कढईत साखर गॅस वर ठेवायची साखर लवकर पातळ होते चमच ने सतत हलवत रहावे एक ते दोन मिनिटात पूर्ण साखर वितळते मग त्यात तिळ टाकुन मिक्स करावे त्यात दोन चमच तुप टाकावे मिश्रण एक जीव झाल्यानंतर गॅस बंद करावा , मिश्रण तयार करण्या अगोदर पोळ पाटाला आणि लाटण्याला तुप लाऊन घ्यावे म्हणजे तयार केलेले मिश्रण पोळपाटाला चिकटणार नाही तिळाच्या मिश्रणाची जाड किंवा पातळ पोळी आपल्या आवडी नुसार लाटावी तिळाची वडी आगदी ठिसुळ होते एकदा नक्की करून बघा .
