आशीर्वादाची फुले वेचावीत वाकुन
----- रावांचे नाव घेते तुमचा मान राखुन
सागवणी टेबलावर शेला टाकते विणून
------ रावांचे नाव घेते आग्रह केला म्हणून
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी
------ रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी
एकादशीला वाहतात विष्णुला तुळशी
----- रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी
दारात होती तुळस, तुलसी ला घालते पाणी
------ माझे राजा मी त्यांची राणी
काचच्या वाटीत गाजराचा हलवा
------ रावांचे नाव घेते सासू बाईना बोलवा
इंग्रजी भाषेत गावताला म्हणतात ग्रास
------ रावांचे नाव घेयायला कसला आला त्रास
इंग्रजी भाषेत तांदळाला म्हणतात राईस
----- राव माझे पहिली चॉईस
गुलाबाचे फूल तोडले तेव्हा ताजे
----- रावांचे नाव घेते स्वभागे माझे
काळे म्हणी हिरवा चुडा
----- रावांचे नाव घेते वाट माझी सोडा
संसार रूपी वेलीचा गगनात गेला झूला
----- रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा मला
पितळच्या भांड्याला तांब्याची खून
------ रावांचे नाव घेते ----- रावांची सून
गुलाबाचे फूल फॅनच्या हवेला
------ ने बहीण दिली ----- रावांच्या सेवेला
