Tandoori Paneer Tikka: घरी हॉटेल तंदूरी पनीर टिक्का बनवणे सोपे आहे. तुम्ही हे ओव्हनशिवाय पण बनवु शकता जर तुम्हाला पनीर खाण्याची आवड असेल आणि ती वेगवेगळ्या पद्धतीने बनवायला आवडत असेल तर तंदूरी पनीर टिक्काची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. ओव्हनचा वापर सहसा तंदूरी रेसिपी बनविण्यासाठी केला जातो. पण या रेसिपीची विशेषता म्हणजे हे बनवण्यासाठी ओव्हनची सुद्धा गरज भासत नाही. तुम्ही हे घरचा गॅसचा वापर करून देखील सहज बनवू शकता. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या ओव्हनशिवाय तंदूरी पनीर टिक्का कसा बनवायचा.
साहित्य:-
* 200 ग्राम पनीर
* अर्धा कप दही
* दिड ते दोन चमच लाल तिखट ( काश्मिरी )
* अर्धा चमच हळद
* पाव चमच काळी मिरी पुड
* मीठ ( चवी नुसार )
* एक चमच गरम मसाला
* एक चमच धने पुड
* पाव चमच ओवा ( बारीक करून )
* दोन ते तीन चमच बेसन
* एक चमच अल लसण पेस्ट
* अर्धा चमच लिंबाचा रस
* एक शिमला मिरची ( एक हिरवी एक लाल )
* कांद्याच्या पाकळ्या
कृती:-
Tandoori Paneer Tikka 200 ग्राम पनीर, अर्धा कप दही, दिड ते दोन चमच लाल तिखट ( काश्मिरी ), अर्धा चमच हळद, पाव चमच काळी मिरी पुड, मीठ ( चवी नुसार ), एक चमच गरम मसाला, एक चमच धने पुड, पाव चमच ओवा ( बारीक करून ) दोन ते तीन चमच बेसन, एक चमच अल लसण पेस्ट, अर्धा चमच लिंबाचा रस, एक शिमला मिरची ( एक हिरवी एक लाल ), कांद्याच्या पाकळ्या. दहयात सर्व मसाले मिक्स करून घ्या. नंतर शिमला मिरचीचे तुकडे कांद्याच्या पाकळ्या पनीरचे तुकडे हे सर्व वेवस्थित मिक्स करून घ्या. आणि अर्धा तास मुरण्यास ठेवा. मुरून झाल्यास पनीर ला तव्यावर फ्राय करू शकता. किंवा विंगळावर पण भजू शकता . अशा प्रकारे घरच्या घरी तंदूरी पनीर टिक्का बनवु शकता.
